छत्रपती संभाजीनगर : कण्व ब्राह्मण समाजाच्या वतीने शिवाजीनगर येथील कण्व भवन येथे गुणवंत विद्यार्थी व ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार करण्यात आला. रविवारी सायंकाळी हा कार्यक्रम पार पडला. यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देखील प्रदान करण्यात आली. .यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे कन्नड येथील इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग ॲण्ड टेक्नॉलॉजीचे प्राचार्य, स्वा. सावरकर विचारांचे अभ्यासक डॉ. अजित मधुकरराव चौधरी होते..यावेळी कार्यक्रमात ७ वी, १० वी, १२ वी, मेडिकल, आय.आय.टी, तायक्वांदो, कराटे, क्रिकेटमध्ये उज्वल यश मिळवणाऱ्या जवळपास ७५ विद्यार्थ्यांचा व ७५ वर्षावरील १५ ज्येष्ठ नागरिकांचा सन्मानपत्र, मोमेंटो व प्रत्येक विद्यार्थ्यास पारितोषिक देऊन सत्कार करण्यात आला..१२ वीला प्रथम आलेल्या स्वानंदी अतिश भाले (९६.६७टक्के) द्वितीय आलेल्या श्रावणी महेश आचार्य (९१.५टक्के) तसेच तर १० वीत ओजस उमेश वझरकर (९७टक्के) हा प्रथम तर वेदिका त्रिलोक भाले (९६.८० टक्के) द्वितीय आल्याने सत्कार करण्यात आला..Maharashtra’s Vision: शिक्षणातील गुंतवणुकीतून ‘महाराष्ट्र मॉडेल’ घडावे.सूत्रसंचालन ज्योती कुलकर्णी व कोषाध्यक्ष धनंजय सीमंत यांनी केले. सचिव धीरज देशपांडे यांनी आभार मानले. यशस्वीतेसाठी उदय मानवतकर, अशोक भाले, विजयालक्ष्मी भाले-कुलकर्णी, प्रफुल्ल कुलकर्णी, संगीता कागबट्टे, सुरेंद्र आनंदगावकर, अलका भाले, तुळशीदास जयपूरकर, महेंद्र मानवतकर, सविता आचार्य, भालचंद्र पिंपळवाडकर, सचिन दैठणकर, अविनाश आडसकर, संतोष इसादकर यांनी प्रयत्न केले..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.