‘लुडो गेम’ खेळत असाल तर... खबरदार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ludo game mobile phones

‘लुडो गेम’ खेळत असाल तर... खबरदार

खुलताबाद : मोबाईल फोनवर लुडो गेमवर पैसे लावून जुगार खेळणाऱ्या तिघांवर खुलताबाद पोलिसांनी कारवाई केली. घटनास्थळावरून पोलिसांनी जुगाराचे साहित्य व रोख रक्कम असा एकूण १० हजार ९०० रुपयाचा मुद्देमाल जप्त करून गुन्हा दाखल केला.

याबाबत पोलिसांनी सांगितले की, काही जण खुलताबाद शहरातील डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक येथील म्हैसमाळ रोड लगत मोकळ्या जागेत सार्वजनिक ठिकाणी मोबाईल फोनवर लुडो गेमवर पैसे लावून जुगार खेळत असल्याची माहिती मिळाली.

पोलिस पथकाने दुपारी शनिवारी (ता.३) १२ वाजता सुमारास छापा मारुन जुगार खेळणारे सय्यद वाजीद सय्यद अनिस, शेख फेरोज शेख बाबू (दोन्ही रा.आजमशाहीपुरा खुलताबाद), शेख रियाज शेख सिराज (रा.गुलाब शहा कॉलनी, खुलताबाद) यांना जुगार खेळताना पकडले. जुगाराचे साहित्य मोबाईल फोन, रोख रक्कम असा १० हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करुन गुन्हा दाखल झाला. सदरची कामगिरी पोलिस निरीक्षक भुजंग हातमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार जाकेर शेख, सिद्धार्थ सदावर्ते यांनी केली.

Web Title: Khuldabad Police Action Against Three Gambled Money Ludo Game Mobile Phones

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..