

Chhatrapati Sambhajinagar
esakal
खुलताबाद: तालुक्यातील एका शेतकऱ्याचा रस्त्याअभावी वेळेत वैद्यकीय उपचार न मिळाल्याने रविवारी (ता. १९) दुपारी मृत्यू झाला. सखाराम किसन जाधव (वय ७३) असे त्यांचे नाव आहे. वस्तीवर जाण्यास रस्ता नसल्यामुळे रुग्णवाहिका घटनास्थळी पोचू न शकल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.