Chhatrapati Sambhajinagar Crime News
esakal
किराडपुरा भागात मैदानावर नशेच्या गोळ्यांची विक्री करणारा तरुण पोलिसांच्या जाळ्यात.
आरोपीकडून ९० गोळ्या, दुचाकी, रोकड व मोबाइल जप्त.
जिन्सी पोलिसांनी ही कारवाई करत आरोपीला बेड्या ठोकल्या.
किराडपुरा : नशेच्या गोळ्या विक्री करणाऱ्याला जिन्सी पोलिसांनी बेड्या ठोकल्या. ही कारवाई (Chhatrapati Sambhajinagar Crime News) शुक्रवारी (ता. २६) किराडपुरा भागातील मैदानावर करण्यात आली. सय्यद अरबाज सय्यद इस्माईल (२९, रा. शरीफ कॉलनी) असे त्याचे नाव आहे. आरोपी सय्यदच्या ताब्यातून नशेच्या ९० गोळ्या, दुचाकी आणि रोकड असा दोन हजार १०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.