

Faith and Food Unite as Kisanbaba’s Bhakari Pangat Thrives
Sakal
बीड : सदगुरू वै. किसान बाबा महाराज यांच्या हस्ते सुरू झालेल्या धर्मनाथ बीजनिमित्त अखंड हरिनाम सप्ताहाचे यंदा ७५ वे अमृत महोत्सवी वर्ष आहे. हा ऐतिहासिक सोहळा श्रीक्षेत्र गोरक्षनाथ टेकडीवर अत्यंत उत्साहात साजरा होणार आहे. या महोत्सवाचे उद्घाटन गुरुवर्य शांतीब्रह्म नवनाथबाबा महाराज यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली १३ जानेवारी, मंगळवार रोजी दुपारी १२ वाजता विधिवत पूजा करून करण्यात येणार आहे.