Crime News: छत्रपती संभाजीनगरजवळ राष्ट्रीय महामार्गावर पहाटे व्यापाऱ्याला चाकूचा धाक दाखवत साठ हजार रुपये लुटले
Highway Robbery: धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर पहाटे फळ व्यापाऱ्याला चाकूचा धाक दाखवून साठ हजार रुपयांना लुटले. ही घटना आडगाव बुद्रूक येथे घडली असून पोलिस आरोपींचा शोध घेत आहेत.
चित्तेपिपंळगाव : फळ खरेदीसाठी जाणाऱ्या व्यापाऱ्याला चाकूचा धाक दाखवून साठ हजार रुपयांना लुटले. ही घटना धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील आडगाव बुद्रूक (ता. छत्रपती संभाजीनगर) येथे बुधवारी पहाटे घडली.