छत्रपती संभाजीनगर : खुलताबाद येथील कोहिनूर शिक्षण संस्थेची सचिव आसमा इद्रिस खान हिने इंग्रजी विषयात, तर सहसचिव मकसूद खान अन्वर खान याने खोट्या कागदपत्रांच्या आधारे पीएचडी नोंदणी केल्याचा आरोप आहे..याप्रकरणी फसवणुकीचा गुन्हा बेगमपुरा पोलिस ठाण्यात नोंद झाला. आसमा खान हिला बेगमपुरा पोलिसांनी रविवारी (ता. ३०) सायंकाळी अटक केली. दुसरा संशयित आरोपी मकसुद खानचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिस उपायुक्त नितीन बगाटे यांनी दिली..याप्रकरणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या परीक्षा विभागाचे उपकुलसचिव विजय मोरे यांनी २६ मार्चला तक्रार दिली होती. कोहिनूर शिक्षण संस्थेची सचिव आसमा इद्रिस खान हिने इंग्रजी विषयात, तर सहसचिव मकसूद खान अन्वर खान याने एमफिलची बनवट पदवी दाखवून त्या आधारे पीएचडीसाठी नोंदणी केल्याची तक्रार रिपाइंचे नागराज गायकवाड यांनी केली होती..याप्रकरणी विद्यापीठाने शहानिशा केली. त्यात तथ्य आढळले. फसवणुकीचा गुन्हा नोंदविला. दरम्यान, या दोघांची पीएचडी नोंदणी रद्द करण्यात आली. कर्नाटकात बनावट पदवी प्रकरणात कोहिनूर शिक्षण संस्थेचा अध्यक्ष मजहर खान आणि सचिव आसमा खानवर गुन्हा नोंद आहे..Eknath Shinde : आभार सभेतून फुंकणार रणशिंग; शिवसेनेचे शक्तीप्रदर्शन; उपमुख्यमंत्री शिंदे जिल्हा दौऱ्यावर .तर, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठात विना परवानगी लेखनिक बसवल्याप्रकरणीही चौकशी सुरू असून, त्या प्रकरणातही फसवणुकीचा गुन्हा नोंद करण्याची मागणी नागराज गायकवाड यांनी केली..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.