छत्रपती संभाजीनगर हादरलं! ठाकरे गटाच्या उपतालुका प्रमुख कृष्णा राठोड यांच्यावर मध्यरात्री चाकू हल्ला

knife attack in Chhatrapati Sambhajinagar MIDC area: छत्रपती संभाजीनगरमधील वाळूज एमआयडीसी परिसरात ठाकरे गटाचे उपतालुका प्रमुख कृष्णा राठोड यांच्यावर मध्यरात्री चाकू हल्ला; सहकारी मन्नू राठोडही गंभीर जखमी, पोलिसांचा तपास सुरू.
Chhatrapati Sambhajinagar crime

Chhatrapati Sambhajinagar crime

esakal

Updated on

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वाळूज एमआयडीसी परिसरातील बजाजनगर या भागात ठाकरे गटाचे उपतालुका प्रमुख कृष्णा राठोड यांच्यावर मध्यरात्री चाकूने हल्ला करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. या हल्ल्यात त्यांच्यासमवेत असलेले सहकारी मन्नू राठोड यांनाही गंभीर दुखापत झाली आहे. मंगळवार दि. १० मार्च रोजी रात्री सुमारे बारा वाजता कामगार चौकात ही संपूर्ण घटना घडली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com