''कुणबी प्रमाणपत्रा''साठी विशेष शिबिर - लातूर जिल्ह्यात १० ते १७ सप्टेंबर दरम्यान महसूल मंडळ स्तरावर शिबिरांचे आयोजन

''कुणबी प्रमाणपत्रा''साठी विशेष शिबिर - लातूर जिल्ह्यात १० ते १७ सप्टेंबर दरम्यान महसूल मंडळ स्तरावर शिबिरांचे आयोजन
Published on
‘कुणबी प्रमाणपत्रां’साठी विशेष शिबिरे --- लातूर, ता. ८ : जिल्ह्यातील पात्र नागरिकांना कुणबी जात प्रमाणपत्र मिळणे सुलभ व्हावे, यासाठी १० ते १७ सप्टेंबर या कालावधीत जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमधील प्रत्येक महसूल मंडळ स्तरावर विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. छत्रपती संभाजीनगर विभागीय आयुक्तांच्या निर्देशानुसार जिल्हा प्रशासनाने या विशेष मोहिमेचे नियोजन केले असून, याअंतर्गत प्रत्येक महसूल मंडळात संबंधित तलाठी, ग्रामसेवक आणि मंडळ अधिकारी यांच्या संयुक्त पथकाद्वारे शिबिरांचे आयोजन केले जाईल. या शिबिरांचा दिनांक, वेळ व ठिकाण याची माहिती नागरिकांना वेळेत मिळावी, यासाठी गावपातळीवर दवंडी देणे, ग्रामपंचायतीच्या नोटीस फलकावर सूचना प्रसिद्ध करणे तसेच स्थानिक व्हॉट्सॲप समूहांच्या माध्यमातून व्यापक जनजागृती करण्याचे निर्देश प्रशासनाकडून देण्यात आले आहेत. आयोजित शिबिरांमध्ये जुन्या कुणबी नोंदी शोधणे, नागरिकांनी सादर केलेल्या पुराव्यांची प्रत्यक्ष पडताळणी करणे, नवीन अर्ज स्वीकारणे, आवश्यक कागदपत्रांची जुळवाजुळव करणे आणि परिपूर्ण अर्ज भरण्यासाठी नागरिकांना मार्गदर्शन व मदत करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. कामकाजात पारदर्शकता आणि गतिमानता राखण्यासाठी उपजिल्हाधिकारी अहिल्या गाठाळ यांची जिल्हास्तरीय नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे. या सर्व मोहिमेचे दैनंदिन संनियंत्रण केले जाणार असल्याने सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार आणि गटविकास अधिकारी यांनी आपल्या स्तरावर सूक्ष्म नियोजन करून आदेशाची प्रभावी व काटेकोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड यांनी दिले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com