

छत्रपती संभाजीनगर : कौशल्य विकास कृषी यांत्रिकीकरण अंतर्गत जिल्हाभरातील शेतकऱ्यांना ‘हायटेक’ करण्याचा वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठांतर्गत पैठण रोड येथील कृषी विज्ञान केंद्राचा प्रयत्न आहे. शेतकऱ्यांसाठी केव्हीके आणि सीएनएच इंडिया यांच्यातर्फे २६ ते २८ नोव्हेंबर तीन दिवसीय यांत्रिकीकरणावर प्रशिक्षण देण्यात आले.