esakal | आता कंपन्यांना कामगार मिळेना
sakal

बोलून बातमी शोधा

 आता कंपन्यांना कामगार मिळेना

वाळूज, शेंद्रा, चिकलठाणा, रेल्वेस्टेशन आणि पैठण येथील एमआयडीसींमध्ये मध्य प्रदेश, बिहार, उत्तर प्रदेश या राज्यांतील कामगार काम करतात. लॉकडाउन असल्यामुळे दीड महिन्यापासून कंपन्या बंद आहेत. त्यातच कामगारांना काम नाही. जेवणाचा प्रश्न गंभीर झाला आहे. त्यामुळे बहुतांश कामगार हे चालत गावी निघून गेले. वाळूज एमआयडीसीमध्ये जवळपास ८० हजार ते एक लाख लाखाच्या आसपास कामगार आहेत.

आता कंपन्यांना कामगार मिळेना

sakal_logo
By
प्रकाश बनकर


औरंगाबाद : येथील औद्योगिक वसाहतींमध्ये काम करणाऱ्या परप्रांतीयांपैकी ३० हजारांहून अधिक परप्रांतीय आपापल्या गावी परतले आहेत. यामुळे वाळूज, शेंद्रा येथील सुरू झालेल्या कंपन्यांना कामगारांचा तुडवडा भासत आहे. कंपन्यांतर्फे ठेकेदारांकडे कामगारांची मागणी करण्यात येत आहे. त्यामुळे औरंगाबादच्या कंपन्यांची भिस्त परप्रांतीय कामगारांवर अवलंबून असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. 

वाळूज, शेंद्रा, चिकलठाणा, रेल्वेस्टेशन आणि पैठण येथील एमआयडीसींमध्ये मध्य प्रदेश, बिहार, उत्तर प्रदेश या राज्यांतील कामगार काम करतात. लॉकडाउन असल्यामुळे दीड महिन्यापासून कंपन्या बंद आहेत. त्यातच कामगारांना काम नाही. जेवणाचा प्रश्न गंभीर झाला आहे. त्यामुळे बहुतांश कामगार हे चालत गावी निघून गेले.

हेही वाचा- तो व्हीडीओ जुनाच पोलिस अधिक्षीक घेणार व्हायरल करणाऱ्यांचा शोध

वाळूज एमआयडीसीमध्ये जवळपास ८० हजार ते एक लाख लाखाच्या आसपास कामगार आहेत. यातील तीस ते चाळीस हजार परप्रांतीय कामगार असून, ते गावी परतले आहेत. याशिवाय ३५ ते ४० हजार परप्रांतीय कामगार हे वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये परमनंट आहेत. ते वाळूज आणि इतर ठिकाणी स्थायिक झालेले आहेत. 

सध्या एंड्युरन्स, व्हेरॉक, बडवे इंजिनिअरिंग व बजाज कंपनीवर अवलंबून असलेल्या व सुरू झालेल्या कंपन्यांना कामगारांचा तुटवडा भासत आहे. त्यामुळे कंत्राटदारांकडे स्थानिक कामगारांची मागणी होत असल्याचे कंत्राटदार साहेबराव मुळे यांनी सांगितले. 

वाळूज एमआयडीसीतील जवळपास ३० ते ४० हजार परप्रांतीय कामगार आपल्या गावी परतले आहेत. काही परतण्याच्या मार्गावर आहेत. ‘बजाज’नंतर सुरू झालेल्या एंड्युरन्स, व्हेरॉक, बडवे इंजिनिअरिंग या कंपन्यांवर अवलंबून असलेल्या कंपन्यांकडून आता कामगारांची मागणी होत आहे. स्थानिक कामगारांच्या माध्यमातून त्यांची मागणी पूर्ण करण्याचा आम्ही प्रयत्न करीत आहोत. 
- साहेबराव मुळे, कंत्राटदार, वाळूज एमआयडीसी. 

loading image