दु:ख, दैन्य व विद्रोहाचा मिलाफ असणारे पुस्तक ः कथाकार सुतार

दु:ख, दैन्य व विद्रोहाचा मिलाफ
असणारे पुस्तक ः कथाकार सुतार
Published on: 
((टीप- लेखिका सारिका यांचे पूर्ण नाव द्यावे)) --- ABD26J82086 समर्थनगर ः लाकडाची देवी कथासंग्रहाचे प्रकाशन करताना समीक्षक डॉ. रामचंद्र काळुंखे, लेखक बालाजी सुतार, कवयित्री डॉ. ललिता गादगे, सारिका, शरयू परळकर आदी.. -- लाकडाची देवी कथासंग्रहातील पात्रे जाणीवजागृत व बंडखोर ः सुतार समर्थनगर ः ‘लाकडाची देवी’ या कथासंग्रहात सारिका यांनी स्त्री-पुरुष संबंधांमधील गुंतागुंत, सामाजिक विषमतेत भरडल्या जाणाऱ्या स्त्रिया आणि सामान्य स्त्री जीवन मांडले आहे. यातील स्त्रीपात्रे केवळ दु:ख आणि दैन्य सहन करणारी नसून, त्यांच्यामध्ये जीवनविषयक दु:ख, दैन्य व विद्रोहाचा मिलाफ दिसून येतो आणि ही पात्रे जाणीवजागृत व बंडखोर आहेत. ग्रामीण जीवन, कामगार जीवन, नात्यांमधील ताणतणाव, प्रेम, दु:ख आणि स्वातंत्र्याचा शोध यांची भिन्न मांडणी या संग्रहात लेखिकेने केली असल्याचे कथाकार बालाजी सुतार यांनी पुस्तक प्रकाशन प्रसंगी सांगितले. समर्थनगर येथील गांधी भवन येथे रविवारी (ता. २५) शब्दालय प्रकाशन आणि प्रगतिशील लेखक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने सारिका यांच्या ‘लाकडाची देवी’ या कथासंग्रहाच्या प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते. ​या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी ललिता गादगे होत्या. समीक्षक रामचंद्र काळुंखे यांनी पुस्तकावर भाष्य केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनात प्रास्ताविक प्रा. समाधान इंगळे यांनी केले, तर आभार सुनील उबाळे यांनी मानले. या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शरयू परळकर यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com