
लातूर : येथील अखिल भारतीय छावा मराठा युवा संघटनेचे शेतकरी आघाडीचे नेते विजयकुमार घाडगे यांना रविवारी (ता. २०) राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी बेदम मारहाण केली होती. याप्रकरणी मंगळवारी (ता. २२) पोलिसांनी चौघांना अटक केली आहे. याप्रकरणी अकरा जणांवर गुन्हा नोंद असून, आतापर्यंत अटक झालेल्यांची संख्या सहा झाली आहे. यातील मुख्य राष्ट्रवादी काँग्रेसचे सूरज चव्हाणसह पाच जणांचा शोध पोलिस घेत आहेत.