Latur Car Burning Case
esakal
लातूर : लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यात कार जळीत प्रकरणामुळे (Latur Car Burning Case) संपूर्ण राज्यात खळबळ उडाली होती. कारमध्ये ५० वर्षीय इसमाचा जळून मृत्यू झाल्याचे समोर आल्यानंतर ही घटना अपघात की घातपात, याबाबत संशय व्यक्त केला जात होता. मात्र, अवघ्या २४ तासांत पोलिसांनी (Police) या प्रकरणाचा छडा लावत धक्कादायक सत्य उघड केलं आहे.