

Political leaders during the Latur District Cooperative Bank election developments.
esakal
छत्रपती संभाजीनगर: लातूर जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीत ताकदीने उतरून बाभळगावच्या देशमुखांची गढी हादरवून सोडण्याचे भाजप आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांचे स्वप्न अखेर भंग पावताना दिसत आहे. महायुतीतील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या साथीने निलंगेकर यांनी आखलेला प्लॅन बाबासाहेब पाटील यांनी काँग्रेस सोबत जात उधळून लावला. विशेष म्हणजे लातूर जिल्हा बँकेच्या सत्तेसाठी काँग्रेसने निलंगेकर यांचे पक्षांतर्गत विरोधक भाजप नेत्यांसाठीही रेड कार्पेट टाकले.