Dr. Babasaheb Ambedkar Statue
esakal
लातूर : येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्क येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar Statue) यांचा ७५ फूट उंच ‘स्टॅच्यू ऑफ नॉलेज’ पुतळा उभारण्यासाठी शासनाने अडीच वर्षांपूर्वी दहा कोटी रुपये निधी मंजूर केला होता. पण त्याला प्रशासकीय मान्यता मिळत नव्हती. मंगळवारी (ता. २८) जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी या दहा कोटींच्या कामाला प्रशासकीय मान्यता दिल्याने हा पुतळा उभारणीचा मार्ग मोकळा झाला आहे. हा पुतळा उभारला गेला तर तो मराठवाड्यातील सर्वांत उंच पुतळा असणार आहे.