Latur Crime News
esakal
लातूर : कोयत्याने एकावर वार करून दहशत पसरविणाऱ्या कोयता गँगच्या दोघांची पोलिसांनी येथे धिंड काढली. गरुड चौकातून घटनास्थळापर्यंत हातात बेड्या घालून त्यांना फिरविण्यात आले. या भागात कोयता गँगची भीती होती. त्यांची दहशत कमी करण्यासाठी पोलिसांनी हा उपक्रम राबविला.