औरंगाबाद - शहरातील मयूरपार्क येथील औषध दुकानातील हा औषधसाठा गोठवण्यात आला.
औरंगाबाद - शहरातील मयूरपार्क येथील औषध दुकानातील हा औषधसाठा गोठवण्यात आला.

वैद्यकीय अधिकारी निलंबित करण्याचे आदेश, औषध आणायला लावणे पडले महागात

तहसीलदारांनी काही फार्मासिस्ट घेऊन येथील महाजन मेडिकलमध्ये चौकशी केली असता एक महिन्यापासून हा प्रकार सुरू असल्याचे उपलब्ध पावत्यावरून लक्षात आले आहे.

निलंगा (जि.लातूर) : येथील उपजिल्हा रूग्णालयात कोरोना रूग्णांवर उपचार करण्यासाठी बाहेरून औषधी आणण्याची सक्ती करणाऱ्या एका वैद्यकीय अधिकाऱ्याचा प्रकार उघडकीस आल्याने तहसीलदारांनी नुकतेच खासगी मेडिकलवर छापा टाकला होता. अखेर संबंधित डॉ. दिनकर पाटील यांना जिल्हाधिकारी यांनी निलंबित करण्याचे आदेश जिल्हा शल्यचिकित्सकांना बुधवारी (ता. २८) रोजी दिले आहेत. याबाबतची माहिती अशी की, सध्या कोरोना संसर्गामुळे सर्वसामान्य जनता त्रस्त आहे. अनेक लोकांना वेळेवर उपचार व औषधी न मिळाल्याने प्राण गमवावा लागत आहे. रूग्णालयात रूग्णांची औषधा अभावी हेळसांड होऊ नये. म्हणून राज्य शासन सर्वोतोपरी प्रयत्न करित आहे. उपजिल्हा रूग्णालयात कोरोनावर इलाज करणारी मुबलक औषधी असताना देखील येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. दिनकर पाटील यांच्याकडून शहरातील (खासगी) महाजन मेडिकलमधील औषधी घेऊन या म्हणून सक्ती करत असल्याची तक्रार एका महिलेने तहसिलदार गणेश जाधव यांच्याकडे केली. तहसिलदार व मुख्याधिकारी यांनी उपजिल्हा रूग्णालयात या बाबीची चौकशी केली असता कोरोनावर उपचार करणारे औषध रूग्णालयात असताना संबंधित वैद्यकीय अधिकारी श्री.पाटील खासगी मेडिकलमधील औषधी का मागवून घेतात याबाबत अधिक चौकशी केली असता संबंधित वैद्यकीय अधिकारी व महाजन मेडिकल यांची मिलीभगत असल्याचे निष्पन्न झाले.

औरंगाबाद - शहरातील मयूरपार्क येथील औषध दुकानातील हा औषधसाठा गोठवण्यात आला.
सुखद! सात महिन्याच्या बाळासह दोन मुलींनी केली कोरोनावर मात

तहसीलदारांनी काही फार्मासिस्ट घेऊन येथील महाजन मेडिकलमध्ये चौकशी केली असता एक महिन्यापासून हा प्रकार सुरू असल्याचे उपलब्ध पावत्यावरून लक्षात आले आहे. याबाबत छापा टाकून त्या पावत्या जप्त केल्या आहेत. सरकारी दवाखान्यात वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत असलेले डॉ. दिनकर पाटील व त्यांच्या पत्नी या महाजन मेडिकलमधील दुसऱ्या मजल्यावर खासगी दवाखाना चालवत असतात. त्यामुळेच ते खासगी मेडिकलमधून औषधी आणण्यासाठी सक्ती करत असल्याचे सांगितले जात आहे. मदनसुरी (ता.निलंगा) येथील एका महिलेच्या पतीचे आठ दिवसांपूर्वी कोरोनामुळे निधन झाले आहे. सदरील महिलेच्या वडीलांना पण कोरोनाची बाधा झाल्याने त्यांना उपजिल्हा रूग्णालय निलंगा येथे दाखल केले असता संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्याने १३ हजार पाचशे रूपयांची औषधी शहरातील महाजन मेडिकलमधून आणण्यासाठी पावती दिली व ती औषध त्यानी घेऊनही आले. संबंधित महिलेकडे पुन्हा लिहून दिलेली औषध आणण्यासाठी पैसे नसल्यामुळे त्या महिलेने थेट तहसिलदार गणेश जाधव यांच्याकडे धाव घेतली व आपले म्हणणे सांगितले. त्यानंतर तात्काळ तहसिलदार यांनी छापा टाकला रूग्णांना खासगी मेडिकलमधून औषध आणायला लावल्याचे सिद्ध झाले आहे. सदरील वैद्यकीय अधिकाऱ्यावर कारवाई करावी असा अहवाल जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठविले असल्याची माहिती तहसिलदार जाधव यांनी दिली. दरम्यान डॉ. दिनकर पाटील यांची या घटनेबाबत कामात निष्काळजीपणा करणे, वरिष्ठांच्या आदेशाचे पालन न करणे, आर्थिक फसवणूक करणे आदी कारणांचा ठपका ठेवून जिल्हाधिकारी बी. पी. पृथ्वीराज यांनी बुधवारी जिल्हा शल्यचिकित्सकांना निलंबीत करण्याचे आदेश दिले आहेत. आता याबाबत निलंबनाचा आदेश जिल्हा शल्यचिकित्सक काढून त्यांना निलंबित करणार आहे. यामुळे येथील उपजिल्हा रूग्णालयात एकच खळबळ उडाली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com