esakal | निलंगा उपजिल्हा रूग्णालय 'व्हेंटिलेटरवर', तज्ज्ञ डाॅक्टर नसल्याने रूग्णांचा जीव टांगणीला

बोलून बातमी शोधा

निलंगा उपजिल्हा रूग्णालय 'व्हेंटिलेटरवर', तज्ज्ञ डाॅक्टर नसल्याने रूग्णांचा जीव टांगणीला
निलंगा उपजिल्हा रूग्णालय 'व्हेंटिलेटरवर', तज्ज्ञ डाॅक्टर नसल्याने रूग्णांचा जीव टांगणीला
sakal_logo
By
राम काळगे

हेही वाचा: पंकजा मुंडेंना कोरोनाची बाधा, सोशल मीडियावरून दिली माहिती

शासनाच्या निकषाप्रमाणे एमबीबीएस डॉक्टर मिळत नसल्यामुळे निलंगा येथील उपजिल्हा रूग्णालयात सहा डेंटल डॉक्टर भरती करून सेवा देणे सुरू आहे. शिवाय येथे रूग्णाची संख्या अधिक असल्यामुळे १७ नर्स कमी पडत आहे. अतिरिक्त ताण येथील डॉक्टर व स्टापवरती पडत आहे. त्यामुळे सध्या रूग्णाचा जीव वाचणे महत्त्वाचे आहे. कारवाई करण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी घाई केली असल्याच्या प्रतिक्रिया अनेकांकडून सोशल मीडियावरती फिरत असून प्रशासनाने दुसरी बाजू न ऐकता एकतर्फी निर्णय घेतल्याने संताप व्यक्त केला जात आहे. झालेले निलंबन त्वरीत मागे घ्यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. येथील उपजिल्हा रुग्णालयात सध्या ९१ रूग्ण असून त्यापैकी ६३ रुग्ण ऑक्सिजनवरती आहेत. पाच रूग्ण व्हेंटीलेटरवरती आहेत. ऑक्सिजन व व्हेंटीलेटरवर हताळण्यास तज्ज्ञ डॉक्टर नसल्यामुळे रूग्णाचे नातेवाईक चिंतीत आहेत. रूग्णांचे काही बरेवाईट झाले तर या प्रकाराला जिम्मेदार कोण? असा सवाल उपस्थित केला जात आहे. अन्य वैद्यकीय अधिकाऱ्यांना व्हेंटिलेटर ऑपरेट करता येत नाही. अशातच नवीन रुग्ण व्हेंटिलेटरवर घेण्याची गरज पडली तर करायचे काय असा प्रश्न डॉक्टरांना पडला आहे.

हेही वाचा: औरंगाबाद पालिका निवडणूक : शपथपत्र दाखल करण्यास चार आठवड्यांची मुदत

ना..नोटीस...ना..मेमो.. थेट निलंबन

दरम्यान जिल्हाधिकारी यांनी वैद्यकीय आधिकारी डॉ. दिनकर पाटील यांना निष्काळजीपणा करणे, वरिष्ठांचे न ऐकणे, शासकीय अधिकारी यांच्यासोबत अशोभनीय वर्तन करणे आदींचा ठपका ठेवण्यात आला आहे. याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना अशा प्रकाराबद्दल वैद्यकीय अधीक्षकांनी साधी कारणे दाखवा नोटीसही दिली नाही अथवा त्यांचे म्हणणे मांडायला संधी दिली नाही. थेट निलंबन केल्यामुळे रूग्णातून रोष व्यक्त केला जात आहे.

कुमोद लोभे... कोरोना बाधित रूग्ण

आमच्या घरी पाचजण कोरोना बाधित होतो. डॉ. दिनकर पाटील याचे केलेले निलंबन निषेधार्ह आहे. त्या माणसाने शेकडो रूग्ण रात्र दिवस मेहनत करून वाचवले आहे. माझ्या घरी आम्ही पाचजण कोरोनाबाधित होतो. पत्नी तर अतिशय गंभीर अवस्थेत होती. अशा संकट काळात डॉक्टरची सेवा महत्त्वाची आहे. प्रशासनाने केलेले एकतर्फी निलंबन रद्द करावे व नंतर चौकशी करावी अशी मागणी त्यांनी केली आहे.