Latur Police
esakal
आत्महत्यांच्या घटनांमध्ये सापडलेल्या चिठ्ठ्या मृत व्यक्तींनी नव्हे, तर दुसऱ्यांनी लिहिल्या होत्या.
पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिस अधीक्षक अमोल तांबे यांनी तपासाची माहिती दिली.
लातूर : जिल्ह्यात काही दिवसांत विविध आरक्षणासंदर्भात आत्महत्या तसेच आत्महत्येचा प्रयत्न (Fake Suicide Note) केल्याच्या घटना घडल्या. संबंधितांच्या खिशात चिठ्ठ्याही आढळल्या. पण, पोलिसांनी (Latur Police) तपासादरम्यान सत्य बाहेर आणले आहे. यात दोन आत्महत्या व एक आत्महत्येच्या प्रयत्नाच्या घटनेत आत्महत्या करणाऱ्यांनी नव्हे, तर चक्क दुसऱ्यांनी चिठ्ठ्या लिहून त्यांच्या खिशात टाकल्याचे उघड झाले.