Chhatrapati Sambhajinagar News: लातूर-नांदेडला अवकाळी पावसानं झोडपलं, वीज कोसळून १६ वर्षीय मुलीचा मृत्यू; वादळी वाऱ्यानं मोठं नुकसान

Fatal Lightning Strike in Deglur Claims 16-Year-Old Girl: लातूर व नांदेड जिल्ह्यांच्या काही भागांत सोमवारी अवकाळी पावसाने ढगाळ वातावरण निर्माण केले. वादळी वाऱ्यामुळे झाडं पडली, विजेचा पुरवठा खंडित झाला. हाणेगाव (ता. देगलूर) परिसरात वीज कोसळून १६ वर्षीय दीपिका संजय पवार यांचा मृत्यू झाला. आगामी पाच दिवसांत मराठवाड्यात विजासह पावसाचा इशारा हवामान तज्ज्ञांनी दिला आहे.
Chhatrapati Sambhajinagar News

Chhatrapati Sambhajinagar News

esakal

Updated on

छत्रपती संभाजीनगर: उन्हाचे चटके तीव्र होऊ लागलेले असताना मराठवाड्या सोमवारी (ता. १६) हवामानात बदल झाला. काही भागांत ढगाळ वातावरणामुळे उन्हाची तीव्रता कमी झाली, तर लातूर व नांदेड जिल्ह्याच्या काही भागांत अवकाळी पाऊस झाला.

देवणी (जि. लातूर) तालुक्यात सायंकाळी वादळी वाऱ्यासह काहीकाळ झालेल्या मुसळधार पावसाने तडाखा दिला. काही ठिकाणी गारपीट झाल्यामुळे शेतकऱ्यांची धावपळ उडाली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com