Minor Student Death Case
esakal
लातूर : शहरातील जवाहर नवोदय विद्यालयातील (Latur Navodaya Vidyalaya) अल्पवयीन विद्यार्थिनीच्या मृत्यू प्रकरणात (Minor Student Death Case) पोलिसांनी अटक केलेल्या दोन महिला कर्मचाऱ्यांचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळून लावल्याची माहिती जिल्हा सरकारी वकील संतोष देशपांडे यांनी दिली. त्यामुळे आरोपींना न्यायालयीन कोठडीतच राहावे लागणार आहे.