लातूर : अल्पवयीन दोन मुलींवर वॉचमनकडून अत्याचार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

crime news

लातूर : अल्पवयीन दोन मुलींवर वॉचमनकडून अत्याचार

लातूर : येथील एका शाळेत खाण्यासाठी चॉकेलट देण्याचा बहाणा करून सहा व सात वर्षांच्या अल्पवयीन दोन मुलींवर अत्याचार करणाऱ्या वॉचमनला एमआयडीसी पोलिसांनी अटक केली. पाच दिवसांपूर्वी अशीच घटना एका शाळेत घडली होती.

येथील एका शाळेत २९ जूनला शाळा भरण्यापूर्वी दोन लहान मुली बागेत खेळत होत्या. त्यावेळी शाळेचा वॉचमन संजय गोविंदराव कोळी (वय ४६) हा तेथे आला. या दोघींना चॉकलेट खायला देण्याचे आमिष दाखवून बाथरूममध्ये नेले. तेथे त्याने या मुलींवर अत्याचार केला. या प्रकरणी पीडितेच्या आईच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करून वॉचमनला अटक केली. त्याला एक दिवसाची पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत, अशी माहिती पोलिस उपनिरीक्षक दीपाली गीते यांनी दिली.

पाच दिवसांत दुसरी घटना

दरम्यान, पाच दिवसांपूर्वी अशीच एक घटना शिवाजीनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका शाळेत घडली. या ठिकाणी शाळेचा शिपाई ओंकार काळे याने शाळेतील एका अकरावर्षीय मुलीला वर्गाचा मॉनिटर करतो, परीक्षेत चांगले गुण मिळवून देतो असे सांगून विनयभंग केला. या प्रकरणीही शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद आहे. पाच दिवसांत असे दोन गुन्हे दाखल झाल्याने शाळातील मुलींच्या सुरक्षिततेसंदर्भात प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. संस्थाचालकांनी याकडे लक्ष देण्याची गरज व्यक्त होत आहे.

Web Title: Latur Watchman Atrocity Two Minor Girls In School

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..