Lendi Dam Project

Lendi Dam Project

Sakal

Lendi Dam Project : कालव्याऐवजी मिळणार पाइपद्वारे पाणी, लेंडी प्रकल्पासाठी भूसंपादन; मावेजावरील होणारा खर्च वाचणार

Nanded Project : लेंडी धरणातून पारंपरिक कालव्याऐवजी बंद नलिका प्रणालीद्वारे पाण्याचा पुरवठा होणार असून, यामुळे पाणी वाचणार आणि भूसंपादनाचा मोठा खर्चही टळणार आहे.
Published on

छत्रपती संभाजीनगर : नांदेड जिल्ह्यातील लेंडी धरणाची घळभरणी झाली. सध्या मुख्य कालवे आणि वितरिका, उपवितरिकांचे काम प्रलंबित आहे. आता या धरणातून पारंपरिक वितरणाऐवजी (कालवा) बंद नलिका प्रणालीद्वारे (पाइप) नियोजन करण्यात आले. त्यासाठी सर्वेक्षण सुरू असल्याची माहिती गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळातील अधिकाऱ्यांनी दिली. महत्त्वाचे म्हणजे बंद पाइपद्वारे पाणी वाया जाणार नाही, तसेच भूसंपादनाचा मोठा खर्च वाचणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com