पाचोड : मागील दीड महिन्यापासून बिबट्या माणसांसह पशुधनाला लक्ष्य करित आहे. रविवारी पहाटे बिबट्याने लिंबगाव (ता.पैठण) येथे कालवडीचा फडशा पाडल्याची घटना घडली आहे..लिंबगावातील सदाशिव भाऊलाल नितळ हे रविवारी सकाळी दूध काढण्यासाठी शेतावर गेले असता त्यांना कालवडीचा फडशा पडलेला दिसला. ही माहिती मिळताच वनरक्षक प्रशांत निकाळजे, प्रभू चोरमारे, बाळू इंगळे, प्रकाश सूर्यवंशी, पंढरीनाथ अहिरे आदींनी घटनास्थळी येऊन पाहणी केली. यावेळी पंचनामा करण्यात आला असून बिबट्याच्या पावलाचे ठसे असल्याचे निष्पन्न झाले..वडजी, थेरगाव, लिंबगाव, रांजणगाव, दादेगाव, खंडाळा कुतूबखेडा, सालवडगावसह परिसरात बिबट्याचे वावर असल्याचे दिसून येत आहे. दहशत पसरविणाऱ्या या नरभक्षक बिबट्याला लवकर जेरबंद करावे, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे..यापूर्वी बिबट्याने केलेले हल्लेयापूर्वी वडजी (ता.पैठण) परिसरात दोन म्हशींसह हरिण, तर ७४ जळगाव येथे नऊ वर्षीय चिमुकलीसह एका शेळीला जीव गमवावा लागला. हर्षी बुद्रूक येथील एका युवकासह वडजी येथील महिलेवर जिवघेणा केला. दीड महिन्यापासून एकामागे एक बिबट्याचे हल्ले आणि तो दिसून येत असल्याच्या घटना घडत असल्याने शेतशिवार ओस पडू लागले आहेत..Mobile Phone Theft : चोरट्याने पोत्यात भरून नेले; तब्बल ११ लाखांचे मोबाइल.वन विभागाच्या अपयशाबद्दल संतापगावोगावी बिबट्या आल्याच्या चर्चेने ग्रामस्थांसह वन कर्मचाऱ्यांचीही दमछाक होऊन ग्रामस्थ रात्रीचे जागरण करित आहेत. दिवसा बिबट्याच्या शोधार्थ वन विभागाच्या कर्मचाऱ्यांसह ग्रामस्थ आपल्या फौजफाट्यासह परिसर पिंजून काढत असून शेतशिवार ओस पडल्याचे चित्र पाहवयास मिळते. वन विभागाने पिंजरा लावूनही बिबट्या हुलकावणी देऊन पाळीव प्राण्यांसह वन्य प्राण्याला आपले लक्ष्य बनवित आहे. वन विभागाला बिबट्या जेरबंद करण्यात अपयश येत असल्याने संताप व्यक्त होत आहे..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.