Leopard Cub : बिबट्याशी केले दोन हात, वाचवला स्वतःचा जीव
Leopard Attack : सासेगाव शिवारात बिबट्याच्या पिल्लाने १६ वर्षीय विद्यार्थ्यावर हल्ला करून त्याला गंभीर जखमी केले. आठ मिनिटे झटापट करून ओंकारने स्वतःचा जीव वाचवला.
कन्नड (जि. छत्रपती संभाजीनगर): तालुक्यातील सासेगाव शिवारातील गट क्रमांक ३१८ मध्ये नामदेव आणाजी घुगे यांच्या शेतातील पत्र्याच्या शेडमधील मुरघासच्या भोतात लपून बसलेल्या बिबट्याच्या पिल्लाने १६ वर्षीय शाळकरी मुलावर हल्ला करत त्याला जखमी केले.