
छत्रपती संभाजीनगर : प्रेमास नकार दिल्यावरून महिलेची आई, वडील व भावाचा खून करण्यात आला होता. या तिहेरी हत्याकांडप्रकरणी आरोपी अमोल भागीनाथ बोर्डे (वय ३५, रा. महादेव गल्ली, चौधरी कॉलनी, चिकलठाणा) याला जन्मठेप आणि ५ हजार रुपये दंडाची शिक्षा अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश ए.ए.जे. खान यांनी ठोठावली.