esakal | औरंगाबादमध्ये मद्य विक्रेत्यांचा धुमाकूळ; होम डिलेव्हरी ऐवजी थेट विक्री

बोलून बातमी शोधा

wine shop
औरंगाबादमध्ये मद्य विक्रेत्यांचा धुमाकूळ; होम डिलेव्हरी ऐवजी थेट विक्री
sakal_logo
By
प्रकाश बनकर

औरंगाबाद: होम डिलेव्हरी ऐवजी थेट मद्य विक्री करणाऱ्यांच्या विरोधात राज्य उत्पादन शुल्क विभागातर्फे दोन दिवसापासून कारवाई करण्यात येत आहे. शनिवारी (ता.२४) पाच मद्य विक्रेत्यांचे परवाने रद्दची कारवाई करण्यात आली. यामध्ये टि.व्ही सेंटर जळगाव रोडवरील वाईन शॉपसह चार मद्य विक्रेते आणि चौका येथील देशी दारू विक्रेत्याचा सामावेश असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक एस. एल. कदम यांनी दिली.

लॉकडाऊनच्या काळात आतापर्यंत एकूण दहा विक्रेत्यांचे परवाने रद्द करण्यात आले आहेत. यामध्ये शुक्रवारी (ता. २३) मोंढा नाका, जुना मोंढा यासह कांचनवाडी येथील मद्य विक्री करणारे व देशी दारूच्या दुकानांचे परवाने रद्द करण्यात आले. शनिवारी (ता. २४) राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक एस. एल कदम यांनी स्वतः रस्त्यावर उतरून काही वाईन शॉप चालकांवर कारवाई केली आहे.

हेही वाचा: Corona Updates: दिलासादायक! बाधितांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण वाढले

होम डिलेव्हरीची परवानगी देण्यात आली असतानाही अनेकांनी थेट मद्य विक्री केली. त्यामुळेच राज्य उत्पादन शुल्क ॲक्शन मोडमध्ये आले आहे. परवानाधारक वाईन शॉप चालकांनी कोरोनाचे नियम पाळणे, शॉप समोर गर्दी जमा न होऊ देण्यांच्या स्पष्ट सूचना असतानाही त्यांनी नियम तोडले. कारवाई अशाच प्रकारे सुरु राहील अशी माहिती एस. एल. कदम यांनी दिली.