esakal | दारु पिऊन तर्राट झालेल्या तरुणीने घातला बसस्थानकात धिंगाणा
sakal

बोलून बातमी शोधा

drunk-girl

दारु पिऊन तर्राट झालेल्या तरुणीने घातला बसस्थानकात धिंगाणा

sakal_logo
By
सुषेन जाधव

औरंगाबाद : स्थळ सिडको बसस्थानक. वेळ गुरुवारी (ता.२९) सायंकाळी पावणे पाचवाजेची. २२ ते २५ वर्षाची ‘ती’ मद्यप्राशन करुन तर्राट झालेली. याच वेळेत तिला एकाने सिडको बसस्थानकावर आणून सोडले अन् तो निघून गेला. तो बसस्थानका बाहेर जातो न जातो तोच ‘ती’ने माझा भाऊ पोलिस निरीक्षक आहे, सीपी साहेब माझ्या ओळखीचे आहेत, अशी नशेत बडबड करत मोबाईलमध्ये स्थानक (Crime In Aurangabad) परिसरातील प्रवाशांची व्हिडीओ शुटींग करण्यास सुरवात केली. त्याच दरम्यान एका प्रवाशाने पोलिस नियंत्रण कक्षाला कॉल दिल्यानंतर पोलिस आलेले पाहताच एका युवकाने येत मी तिचा नातेवाईक आहे, असे म्हणत ‘त्या’युवतीला रिक्षात घेऊन गेला. एक युवती नशेत तर्रर्र झालेली असून प्रवाशांचा व्हिडीओ शुट करत असल्याची माहिती एका प्रवाशाने नियंत्रण कक्षाला दिली होती. तिला एका युवकाने स्कूटीवर (एमएच २० ईए ००३८) बसस्थानकावर आणून सोडल्याची माहिती बीट मार्शल एन एम. घुसिंगे यांनी दिली. सदर युवतीने बसस्थानक (Aurangabad) परिसरात नशेत गोंधळ घातल्याने प्रवाशांचीही एकच गर्दी झाली होती.(liquor drunk young girl misbehave at bus stand in aurangabad glp88)

हेही वाचा: पदवी परीक्षा: पहिल्या दिवशी ६६ हजार ४४१ जणांनी दिले ऑनलाईन पेपर

दरम्यान ‘त्या’ युवतीने आपला मोर्चा बसस्थानक परिसरातील सुलभ शौचालयाकडे वळविला आणि तिथे बसलेल्या कर्मचाऱ्यांना ‘शौचालय स्वच्छ ठेवत जा’अशा नशेतच सूचना करत होती. दरम्यान निर्मला निंभोरे यांच्या दामिनी पथकाने आणि एमआयडीसी पोलिस ठाण्याचे बीट मार्शल यांनी तात्काळ धाव घेतली. दरम्यान पोलिस आल्याचे पाहताच ‘त्या’ युवतीला ही माझी नातेवाईक आहे असे म्हणत एक तरुण रिक्षाने (एमएच २० ईएफ १४०९) आला आणि पटकन घेऊन गेला. संबंधित दुचाकी आणि रिक्षाच्या क्रमांकावरुन युवतीला सोडायला आलेला तरुण नेमका कोण आणि घेऊन जाणारा कोण आहे याचा शोध घेणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. यावेळी स्थानकावर प्रवाशांनी एकच गर्दी केली होती. दामिनी पथकाच्या निर्मला निंभोरे, हिना पठाण, प्रियांका भिवसने, छाया जाधव यांच्यासह एमआयडीसी सिडको ठाण्याचे बीट मार्शल एन. एम. घुसिंगे, उदयसिंग घुसिंगे यांनी गर्दी हटवत परिस्थिती नियंत्रणात आणली.

loading image
go to top