
छत्रपती संभाजीनगर: लग्न झालेले नसले तरी तक्रारदार महिला आणि आरोपी पुरुष हे बरीच वर्षे ‘लिव्ह इन’मध्ये पती-पत्नी म्हणून राहत होते. त्यांच्यात घडलेल्या शारीरिक संबंधांना फिर्यादी महिलेची संमती नव्हती असे म्हणता येणार नाही, अशा आशयाचे निरीक्षण नोंदवत मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद येथील खंडपीठाने चोपडा येथील संबंधित पुरुषासह त्याच्या कुटुंबीयाविरुद्ध नोंद अत्याचाराचा गुन्हा आणि न्यायालयात दाखल दोषारोपपत्र रद्द केले.