Lok Sabha Poll : जिल्ह्यातील १,३८४ जण करणार घरून मतदान; ज्येष्ठ, दिव्यांगांची गैरसोय टळणार

लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्ह्यातील दिव्यांग आणि ८५ वर्षांपुढील मतदारांचे घरबसल्या मतदान करून घेण्यासाठी बीएलओंमार्फत ६८ हजार ९०६ मतदारांकडून डी-१२ हा फॉर्म भरून घेण्यात आले.
 lok sabha election chhatrapati sambhajinagar 1384 people vote from home
lok sabha election chhatrapati sambhajinagar 1384 people vote from homeSakal

छत्रपती संभाजीनगर : लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्ह्यातील दिव्यांग आणि ८५ वर्षांपुढील मतदारांचे घरबसल्या मतदान करून घेण्यासाठी बीएलओंमार्फत ६८ हजार ९०६ मतदारांकडून डी-१२ हा फॉर्म भरून घेण्यात आले.

त्यानुसार जिल्ह्याच्या सहा विधानसभा मतदार संघातील ६९९ तर शहरातील तीन मतदार संघातील ६८५ दिव्यांग व ज्येष्ठ मतदार घरबसल्या पोस्टल बॅलेटद्वारे मतदानाचा हक्क बजावणार आहेत. ही एकूण संख्या १,३८४ आहे.

लोकसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी मतदारांना प्रोत्साहित केले जात आहे. दिव्यांग आणि ज्येष्ठांना उन्हाचा त्रास होऊ नये. यासाठी घरबसल्या मतदानाची व्यवस्था करण्यात आली आहे; तसेच मतदान केंद्रांवरदेखील खुर्ची, मंडप, पिण्याचे पाणी, पाळणा घराची सोय करण्यात आली आहे.

वृद्धांनी व दिव्यांगांच्या मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी बीएलओंनी २२ एप्रिलपर्यंत ६८ हजार ९०६ मतदारांची भेट घेतली. त्यांच्याकडून डी-१२ क्रमांकाचा फॉर्म भरून घेण्यात आला. त्यानुसार ८५ वर्षांपुढील ११४७ आणि २३७ दिव्यांग घरबसल्या पोस्टल बॅलेटद्वारे मतदानाचा हक्क बजावणार आहेत तर ६१ हजार ६८७ मतदार प्रत्यक्षात केंद्रावर मतदान करणार आहेत.

७ ते १० मे दरम्यान मतदान

ज्येष्ठ आणि दिव्यांगांचे ७ ते १० मे दरम्यान मतदान घेतले जाणार आहे. पोस्टल बॅलेटद्वारे मतदान घेताना सूक्ष्म निरीक्षक, पोलिस, कॅमेरामन तसेच सर्व साहित्यासह पथक घरी जाणार आहे. मतदान झाल्यानंतर १३ ए फॉर्मवर स्वाक्षरी घेतली जाणार आहे. १३ सी या विशिष्ट प्रकारच्या मतपत्रिकेवर उमेदवाराच्या नावापुढे मार्किंग करण्यासाठी दिला जाणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com