Loksabha election 2024 : एलजीबीटीक्यू समूदायाकडे सर्वांचंच दुर्लक्ष, तरीही मतदानाचा हक्क बजावणार; काय आहेत अपेक्षा?

एलजीबीटीक्यू समुदायाचा जाहीरनाम्यात समावेश नाही, तरीही मतदानाचे कर्तव्य पूर्ण करणार
Loksabha election 2024 what are the expectations LGBTQ community ignored by all political party still exercise voting rights
Loksabha election 2024 what are the expectations LGBTQ community ignored by all political party still exercise voting rights Sakal

छत्रपती संभाजीनगर : सर्वच राजकीय पक्षांनी आपापले जाहीरनामे प्रसिद्ध केले. मात्र एकाही राजकीय पक्षाने आमची दखल घेतली नाही. निवडणूकीच्या प्रचारात आमच्याशी संवाद साधला नाही. आम्ही तरीही लोकशाहीवर विश्वास ठेवतो.

पहिल्यांदा मतदान करण्याची संधी मिळाल्याचा आनंद असून आम्ही मतदान करणारा, अशी प्रतिक्रिया तृतीयपंथी सामाजिक विकास संस्थेचे ( एलजीबीटीक्यू) अध्यक्ष अल्ताफ शेख यांनी ' सकाळ'ला दिली.

वेगवेगळ्या लैंगिकता असलेल्या व्यक्तींचे सर्व गट आता ‘एलजीबीटीक्यू’ या छत्राखाली एकत्र आले आले आहेत. एलजीबीटीक्यू समुदाय आपली ओळख जपण्यासाठी आणि समाजात स्थान मिळवण्याची धडपड करतो. पण जीवनमान उंचावताना त्यांना अनेक समस्या येतात. यामध्ये शिक्षण, ओळखपत्र नसणे, दारिद्रय, निवारा नसणे, बेरोजगारीसह सामाजिक स्वीकार हे प्रश्न प्रामुख्याने आहेत.

लॉकडाऊनमध्येही या कम्युनिटीवर करोना निर्बंधामुळे उपासमारीची वेळ ओढवली आहे. संसर्ग रोखण्यासाठी लावलेली संचारबंदी यामुळे जिल्ह्यातील तीन हजार एलजीबीटीक्यू कम्युनिटीसमोर धान्याची टंचाई निर्माण झाली होती. तृतीयपंथी सामाजिक विकास संस्था या संपूर्ण समुदायासाठी काम करत असून त्यांची नोंदणी आणि ओळखपत्र मिळवून देण्याचे उपक्रम राबवते.

सध्या जिल्ह्यात एलजीबीटीक्यू समुदायाच्या ४ हजार ७८४ नोंदणी आहेत. यंत्रणा त्यांची स्वतंत्र कँटेगरी करत नाही. त्यामुळे त्यांना 'तृतीयपंथियांच्या' श्रेणीमध्येच गणले जाते. या समुदायाचे जिल्ह्यात २ हजार १४० मतदार असून यामध्ये ७८४ तृतीयपंथीय व उर्वरित अन्य श्रेणीमध्ये येतात. यामध्ये ९० टक्के व्यक्ती पहिल्यांदाच मतदानाचे कर्तव्य बजावतील.

राजकीय पक्षांनी मतदार म्हणून निवडणूक आयोग किंवा उमेदवारांना आमची आठवण येत नाही. कुठल्याही पक्षाच्या जाहीरनाम्यात आम्हा लोकांचा उल्लेख नसतो. निवडणुकीतील घराणेशाही बंद झाली पाहिजे. उमेदवार सुशिक्षित,संविधानवादी असावा. जाती धर्माचे राजकारण आता थांबायला पाहिजे.

- सँडी गुरू, सामाजिक कार्यकर्त्या

कोणत्याही राजकीय पक्षांनी आमची दखल घेतली नाही. पक्षांच्या जाहीरनाम्यात आमचा समावेश नाही. तरीही मतदानाचे कर्तव्य पूर्ण करणार. निवडून येणारे उमेदवार आमचा किमान ' माणूस ' म्हणून तरी विचार करतील, अशी अपेक्षा आम्ही ठेवतो.

- अल्ताफ शेख, तृतीयपंथी सामाजिक विकास संस्था ( एलजीबीटीक्यू)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com