esakal | औरंगाबाद जिल्ह्यात गुलाबने केले दोन दिवसात १४१ कोटीचे नुकसान । Gulab
sakal

बोलून बातमी शोधा

औरंगाबाद जिल्ह्यात गुलाबने केले दोन दिवसात १४१ कोटीचे नुकसान

औरंगाबाद जिल्ह्यात गुलाबने केले दोन दिवसात १४१ कोटीचे नुकसान

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद : गुलाब चक्रीवादळामुळे झालेल्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात १४१ कोटी ४६ लाख ४८ हजार रूपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. पुरात अडकलेल्या साडेपाचशेहून अधिक लोकांची मदत करून सुटका करण्यात आलेली आहे तर २६० लोकांना स्थलांतरीत करण्यात आले आहे. सध्या पंचनामे करण्याचे काम सुरू आहे.

हेही वाचा: यवतमाळ : बाळ विक्री करणाऱ्या टोळीवर कारवाई केल्याने मोठा अनर्थ टळला

अतिवृष्टीमुळे पावसाने मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. पिके पाण्याखाली गेली असून शेतकऱ्यांचा हातातोंडाशी आलेला घास यंदा निसर्गाने हिरावुन घेतल. सप्टेबरमध्ये जिल्ह्याच्या अनेक मंडळात अतिवृष्टी झाली होती. गेल्या दोन दिवसात गुलाब चक्रीवादळाच्या प्रभावामुळे मुसळधार पावसाने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पावसाने १ लाख ८५ हजार २१५ हेक्टरवरील पीकाचे, शेतीचे नुकसान झाले आहे.

याशिवाय मोठ्या प्रमाणात जीवित आणि वित्त हानी झाली आहे. झालेले जीवित व वित्तहानी मिळून झालेले नुकसान हे १४१ कोटी ४६ लाख ४८ हजार असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. खरीप हंगाम हातचा गेल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयाकडून सोमवार (ता. २७ ) आणि मंगळवारी (ता. २८ ) झालेल्या अतिवृष्टीच्या नुकसानीची आकडेवारी आणि त्यासाठी अपेक्षित निधी याबाबत प्राथमिक अहवाल तयार केला आहे.

हेही वाचा: चक्रीवादळाला कोण ठेवते गुलाब, शाहीन, त्योक्ते अशी नावे

दोन दिवसातील मुसळधार पावसाने २ लाख २९ हजार ३२ शेतकऱ्यांच्या १ लाख ८५ हजार २१५ हेक्टर क्षेत्रावरील पीकांचे नुकसान झाले आहे. यासाठी तब्बल १२५ कोटी ९४ लाख ६२ हजार रूपयांच्या अर्थिक मदतीची गरज भासणार असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. ५५१ लोक पुरात अडकले होते. स्थानिक प्रशासन, तहसीलदार शोध व बचाव पथकामार्फेत या पुरात अडकलेल्या लोकांची मदत करून सुटका करण्यात आली आहे. तर २६० लोकांना स्थलांतरीत करून सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे. १५२ जणांची तात्पुरत्या निवारागृहात व्यवस्था करण्यात आली आहे. जिल्हा परिषदेची एक शाळा पडली आहे. चार तलाव फुटल्याने ३३ हेक्टर आर क्षेत्राचे नुकसान झाले आहे.

दोन दिवसात ६ जणांचा मृत्यू तर ३० दुभती जनावरे दगावली.

४३३ घरांची अंशतः पडझड

तीन शेततळ्यांचे नुकसान झाले

१७ कोल्हापुरी बंधाऱ्यांचे नुकसान

महावितरणच्या २१६ पायाभुत सुविधांची हानी झाली आहे.

३६ पुल वाहून गेले तर ३३ किलोमीटरचे रस्ते खराब झाले.

loading image
go to top