esakal | चक्रीवादळाला कोण ठेवते गुलाब, शाहीन, त्योक्ते अशी नावे । gulab
sakal

बोलून बातमी शोधा

चक्रीवादळाला कोण ठेवते गुलाब, शाहीन, त्योक्ते अशी नावे

चक्रीवादळाला कोण ठेवते गुलाब, शाहीन, त्योक्ते अशी नावे

sakal_logo
By
मधुकर कांबळे

औरंगाबाद : हवामानशास्त्रज्ञांनी माहितीचे आदानप्रदान करता यावे यासाठी चक्रीवादळांना नावे देण्याला सुरुवात झाली. 'निसर्ग', ‘शाहीन',‘त्योक्ते',‘गुलाब' अशा नावांनी चक्रीवादळे ओळखली जातात. मात्र या वादळांना अशी नावे देतो कोण असा प्रश्‍न निर्माण होतो.

तेंव्हा त्याचे उत्तर जगातल्या चक्रीवादळाच्या नामकरणाची जबाबदारी ही रिजनल स्पेशलाइज्ड मेटिओरॉलॉजिकल सेंटर्स आणि ट्रॉपिकल सायक्लोन वार्मिंग सेंटर्स आहे. ज्या सागरामध्ये किंवा प्रदेशातून चक्रीवादळे तयार होतात त्या आधारांवर चक्रीवादळांची नावे ठरतात. एकाच वेळी अनेक वादळे निर्माण झाल्यास त्यांना ओळखण्यासाठी मदत व्हावी यासाठी चक्रीवादळांना नावे देण्यात येत असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले.

हेही वाचा: खासदार गवळींना वर्षा बंगल्यावर नो एंट्री? गेटवरूनच परतल्या माघारी

आंतरराष्ट्रीय हवामान तज्ज्ञ प्रा किरणकुमार जोहरे यांनी सांगितले, २००४ मध्ये जागतिक हवामान संघटना (डब्ल्यूएमओ)च्या अध्यक्षतेखालील आंतरराष्ट्रीय पॅनल रद्द करण्यात आलं आणि संबंधित देशांनाच आपापल्या क्षेत्रात येणाऱ्या चक्रीवादळाची नावे ठेवायला सांगितले.

उत्तर हिंदी महासागरातील क्षेत्रात येणाऱ्या वादळांची नावे या सूचीतून ठेवली जातात. चक्रीवादळांची अनुक्रमे 'गुलाब' व 'शाहीन' नावे देण्याचे ठरले आहे. हिंदी महासागरात होणाऱ्या चक्रीवादळाला इंग्लिश भाषेत सायक्लॉन, अटलांटिकमध्ये होणाऱ्याला हरिकेन आणि पॅसिफिक महासागरातील चक्रीवादळाला टायफून या नावाने ओळखले जाते.

हेही वाचा: औरंगाबादेत अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांचे मदतीसाठी लोटांगण आंदोलन

जागतिक हवामान संस्थेने २००० पासून एक नियमावली बनवत, काही मापदंड तयार केले व निसर्गाशी संबंधित किंवा एखाद्या खाद्य पदार्थाची नावे चक्रीवादळांना मिळू लागली. आलटून पालटून स्त्रीलिंगी व पुल्लिंगी नावांचा वापरही सुरू झाला. 'निसर्ग' हे नाव चक्रीवादळाला बांगलादेशाने घोषित केले होते.

जगातल्या चक्रीवादळांच्या नामकरणाची जबाबदारी ही रिजनल स्पेशलाइज्ड मेटिओरॉलॉजिकल सेंटर्स (रिजनल स्पेशलाइज्ड मेटिओरॉलॉजिकल सेंटर्स ) आणि ट्रॉपिकल सायक्लोन वार्मिंग सेंटर्स (टीसीडब्ल्यूसी)यांची आहे. भारताच्या हवामान खात्यासह एकूण सहा आरएसएमसी आणि पाच टीसीडब्ल्यूसी आहेत. अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरासह उत्तर भारतीय समुद्रावर विकसित होणाऱ्या चक्रीवादळांची नावे ठेवण्याची जबाबदारी भारतीय हवामानशास्त्र विभागाला (आयएमडी) देण्यात आली आहे.

हेही वाचा: गुन्हेगारी कुटूंबाच्या संरक्षण व पालन पोषणाची जबाबदारी कोणाची?

जागतिक हवामान संस्था म्हणजे वर्ल्ड मेटिओरॉलॉजी ऑर्गनायझेशन (डब्ल्यूएमओ) आणि आशिया आणि पॅसिफिकसाठीचे संयुक्त राष्ट्रांचे आर्थिक आणि सामाजिक आयोग म्हणजे यूएन इकॉनॉमिक ड सोशल कमिशन फॉर एशिया अॅड द पॅसिफिक यांनी २००० मध्ये बंगालच्या उपसागर आणि अरबी समुद्रातील उष्ण कटिबंधीय चक्रिवादळांना नावे देण्यास सहमती दर्शविली होती. परिणामी हिंद महासागरात म्हणजे बंगालच्या उपसागरातील व अरबी समुद्रातील चक्रीवादळांना नावे देण्याचे काम २००० मध्ये सुरू झाले आणि २००४ मध्ये फॉर्म्युल्यावर सहमती झाली.

बांगलादेश, भारत, मालदीव, म्यानमार, ओमान, पाकिस्तान, श्रीलंका आणि थायलंड हे या पॅनलचा भाग होते. नंतर २०१८ मध्ये इराण, कतार, सौदी अरेबिया, यूएई आणि येमेन यांना या यादीत समाविष्ट केले गेले. वादळांचा इशारा प्रभावीपणे लोकांना देण्यासाठी तसेच सायंटिफिक कम्युनिटीला आणि आपत्ती व्यवस्थापकांना मदत करण्यासाठी ट्रॉपिकल म्हणजे उष्ण कटिबंधीय चक्रीवादळांना नावे देण्यात येते. एकाच वेळी अनेक वादळे निर्माण झाल्यास त्यांना ओळखण्यासदेखील यामुळे मदत होते असे प्रा. जोहरे यांनी सांगितले आहे.

चक्रीवादळांच्या नावांची यादी

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या भुगोल विभागाचे प्रमुख व हवामानाचे अभ्यासक डॉ.मदन सूर्यवंशी यांनी सांगितले, जागतिक हवामानशास्त्र संघटनेने वादळांची नावे ठेवण्यासाठी एक पद्धत ठरवली आहे. त्यानुसार विविध देश त्यांच्यातर्फे नावे सुचवतात. १९५३ पासून मायामी नॅशनल हरिकेन सेंटर आणि वर्ल्ड मेट्रॉलॉजिकल ऑर्गनायझेशन (डब्ल्यूएमओ) चक्रीवादळे आणि उष्णकटीबंधीय चक्रीवादळांची नावे ठेवते.

डब्ल्यूएमओ ही जिनिव्हास्थित संयुक्त राष्ट्राची एक संघटना आहे. परंतु उत्तर हिंदी महासागरातील चक्रीवादळांची नावे ठेवली गेली नव्हती. कारण या वादळांची नावे ठेवणे एक वादग्रस्त काम होते. डब्ल्यूएमओच्या अध्यक्षतेखालील आंतरराष्ट्रीय पॅनल रद्द करण्यात आले आणि संबंधित देशांनीच आपापल्या क्षेत्रात येणाऱ्या चक्रीवादळाची नावे ठेवायला सांगितले.

यानंतर भारत, पाकिस्तान, बांगलादेश, मालदीव, म्यानमार, ओमान, श्रीलंका आणि थायलंड अशा देशांनी मिळून एक बैठक घेतली. या देशांनी ६४ नावांची एक यादी सोपवली. त्यात प्रत्येक देशात येणाऱ्या चक्रीवादळासाठी आठ नावे सुचवण्यात आली. उत्तर हिंदी महासागरातील क्षेत्रात येणाऱ्या वादळांची नावे या सूचीतून ठेवली जातात. वादळांची नावे विविध देशांनी सुचवलेल्या नावांमधूनच ठेवली जात असल्याचे डॉ. सुर्यवंशी यांनी सांगितले.

loading image
go to top