

In Sickness and Health: Woman’s Kidney Gift Revives Husband’s Life
Sakal
-नीलकंठ कांबळे
लोहारा (जि. धाराशिव) : प्रेम, कर्तव्य आणि जबाबदारीचा आदर्श एका दानशूर पतिव्रतेने समाजासमोर ठेवला आहे. हराळी (ता. लोहारा) येथील वर्षा पाटील (वय ४०) यांनी किडनी दान करून पती राहुल यांना जीवनदान दिले आहे. या दानाबद्दल वर्षा यांच्यावर जिल्हाभरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.