Aurangabad : नऊ हजार जनावरांना लम्पीचे लसीकरण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Aurangabad : नऊ हजार जनावरांना लम्पीचे लसीकरण

Aurangabad : नऊ हजार जनावरांना लम्पीचे लसीकरण

गंगापूर : गंगापूर तालुक्यात तब्बल नऊ हजार जनावरांना लम्पीचे प्रतिबंधात्मक लसीकरण करण्यात आले आहे. यात गांगपूर, लासूर स्टेशन, मांजरी व वाहेगाव परिसराचा समावेश आहे. जनावरांना लसीकरण करण्यासाठी मनुष्यबळाची कमतरता असल्याने स्थानिक पातळीवर खासगीत सहकार्य घेऊन लसीकरण करण्यात येत आहे, अशी माहिती पशू विभागाचे सहाय्यक आयुक्त राजशेखर दडके यांनी दिली.

ते पुढे म्हणाले की, पशूंमध्ये लम्पी रोगाची लक्षणे आढळून आल्यास प्रत्येक व्यक्‍ती, अशासकीय संस्था, संबंधित स्थानिक स्वराज्य संस्था आदी यांनी लेखी स्वरूपात नजीकच्या पशुवैद्यकीय संस्थेस कळविणे बंधनकारक आहे. त्यांनी सांगितले की, राज्य शासनामार्फत तालुक्यात दोन हजार तर जिल्हा परिषदेमार्फत सात हजार लसीचे वाटप करण्यात आले आहे.

तालुक्यात ६८ हजार गोवंश आहेत. ते पुढे म्हणाले की, चारा कमी खाणाऱ्या जनावरांचा तत्काळ ताप मोजावा व नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्याशी संपर्क साधून उपचार करून घ्यावे, बाधित जनावरे निरोगी जनावरांपासून वेगळे ठेवावे. रोग प्रादुर्भाव झालेल्या गावातील बाधित जनावरांना कुरणामध्ये एकत्रित सोडण्यास मनाई असून डास, माश्या, गोचीड तत्सम कीटकांचा पशुवैद्याच्या सल्ल्याने औषधाचा वापर करून बंदोबस्त करावा.

तसेच निरोगी जनावराच्या अंगावर किटक येऊ नये म्हणून औषधे लावणे व गोठ्यामध्ये यासाठीच्या औषधींची फवारणी करणे, आजारी जनावरांवर विषारी औषध फवारणी करू नये, रोग प्रादुर्भाव क्षेत्रातील जनावरांना रोग प्रादुर्भाव नसलेल्या ठिकाणी तसेच जनावरांच्या स्थानिक बाजारामध्ये नेण्यास प्रतिबंध असून त्वचेवरील गाठीचे जखमेत रूपांतर झाल्यास जखमेत जंत पडू नये, यासाठी जखमेवर औषधी मलम लावावे, असे सहाय्यक आयुक्त राजशेखर दडके यांनी सांगितले.

Web Title: Lumpy Gangapur Taluka Animal Cow Vaccination Aurangabad

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..