
कन्नड : जनावरांच्या लंपी स्किन या आजाराने आता कन्नड तालुक्यात शिरकाव केला आहे. गेल्या आठ दिवसांत दोन गायींना व दोन वासरांना अशा चार जनावरांना याची लागण झाली आहे, अशी माहिती कन्नड पशुसंवर्धन कार्यालयाकडून प्राप्त झाली आहे. त्यामुळे तालुक्यातील पशुधनमालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.