औरंगाबाद : आज महामेट्रोचा होणार कार्यारंभ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Mahametro

औरंगाबाद : आज महामेट्रोचा होणार कार्यारंभ

औरंगाबाद : वाळूज ते शेंद्रा डीएमआयसीपर्यंत मेट्रो(metro) व उड्डाणपुलाचा डीपीआर (flyover dpr )तयार करण्यासाठी स्मार्ट सिटी(smart city aurangabad) योजनेअंतर्गत महाराष्ट्र रेल्वे कार्पोरेशनची (mahametro) नियुक्ती करण्यात आली आहे. त्यानुसार शुक्रवारी (ता. १४) या कामाचा कार्यारंभ आदेश दिला जाणार आहे. डीपीआरच्या कामासाठी सुमारे पाच कोटी रुपयांपर्यंत खर्च अपेक्षीत आहे.पहिल्या टप्प्यात वाळूज ते शेंद्रा डीएमआयसीपर्यंत मेट्रोचा डीपीआर तयार केला जाणार आहे. त्यासोबतच शहरात एकच उड्डाणपूल तयार करण्याची मागणी वाढत आहे. त्यामुळे मेट्रोसोबतच उड्डाणपुलाचा डीपीआर तयार केला जाणार आहे. मंगळवारी (ता. ११) केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली. (Union Minister of State Dr. Bhagwat Karad)

हेही वाचा: मराठी पाट्या लावून मराठी तरुणांना नोकऱ्या देणार का - इम्तियाज जलील

सर्वसमावेशक गतिशीलता आराखडा आणि मेट्रो, उड्डाणपुलाचा सविस्तर प्रकल्प आराखडा तयार करण्यासाठी महा मेट्रोची निवड करण्यात आली. महामेट्रो ही केंद्र व राज्य सरकारची संयुक्त कंपनी असल्यामुळे या कंपनीला डीपीआरसाठी लागणारे पाच कोटी रुपये देण्याची तयारी स्मार्ट सिटीने दर्शवली आहे. शुक्रवारी स्मार्ट सिटीतर्फे(smart city aurnagabad) महामेट्रोला कार्यारंभ आदेश दिले जाणार आहेत, असे सूत्रांनी सांगितले.

हेही वाचा: जालना : फळविक्री करणाऱ्या तरुणाचा खून; चाकून भोसकले

सर्वसमावेशक गतिशीलता आराखड्याला महत्त्व

मेट्रो रेल्वे(metro railway), उड्डाणपुलासह शहराचा सर्वसमावेशक गतिशीलता आराखडा (CMP) तयार करण्याचे काम महा मेट्रोला(mahametro) देण्यात आले आहे. हा आराखडा तयार होणार असल्याने शहर विकासातील अडथळे दूर होणार आहेत. आगामी सहा महिन्यात हा आराखडा तयार होऊ शकतो, असे सूत्रांनी सांगितले.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top