काही वर्षांपूर्वीपर्यंत चित्रपटांमध्ये हिंदू धर्मातील साधू-संतांना चुकीच्या पद्धतीने चित्रित केले गेले. त्याच पद्धतीने मुस्लिम धर्मगुरू किंवा ख्रिश्चन धर्मगुरूंविरोधात असे दाखवले गेले नाही.
छत्रपती संभाजीनगर : गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांनी ब्रिटिश राजा जॉर्ज याच्या स्तुतीसाठी ‘जन गण मन’ हे स्तुती गीत लिहिले. त्यामुळे ‘जन गण मन’ऐवजी ‘वंदे मातरम्’ हे भारताचे राष्ट्रगीत असायला हवे, असे विधान महंत रामगिरी महाराज (Ramgiri Maharaj) यांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये मंगळवारी (ता. सात) एका कार्यक्रमात केले.