संस्थास्तरीय फेऱ्यांसाठी निरीक्षकाची नियुक्ती होणार

संस्थास्तरीय फेऱ्यांसाठी 
निरीक्षकाची नियुक्ती होणार
Published on
संस्थास्तरीय फेऱ्यांसाठी निरीक्षकाची नियुक्ती होणार ------- प्रवेश प्रक्रियेचे व्हिडिओ रेकॉर्डिंग होणार ः त्रुटी आढळल्यास संस्थेवर कारवाई ---- छत्रपती संभाजीनगर, ता. २ : तंत्रशिक्षण अभ्यासक्रमांच्या २०२६-२७ या शैक्षणिक वर्षातील केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेच्या सर्व फेऱ्या पूर्ण झाल्यानंतर होणाऱ्या संस्थास्तरीय प्रवेश फेऱ्या पारदर्शक करण्यासाठी महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने कडक उपाययोजना केल्या आहेत. निवडक खासगी महाविद्यालयांमध्ये संस्थास्तरीय प्रवेशासाठी निरीक्षकांची नियुक्ती करण्यात येणार असून, संपूर्ण प्रवेश प्रक्रियेचे सीसीटीव्हीअंतर्गत व्हिडिओ रेकॉर्डिंग करणे बंधनकारक करण्यात आले आहे. नियमांचे उल्लंघन आढळल्यास संबंधित संस्थेवर कठोर प्रशासकीय व कायदेशीर कारवाई केली जाईल. संस्थास्तरीय प्रवेश प्रक्रिया माहिती पुस्तिकेतील नियम १३ नुसारच राबवावी लागेल. कॅपच्या सर्व फेऱ्या पूर्ण झाल्यानंतरच ही प्रक्रिया घेता येईल. रिक्त जागांचे वाटप उमेदवारांच्या गुणवत्तेनुसार म्हणजेच ‘इंटर से मेरीट’नुसार करणे बंधनकारक आहे. महाविद्यालयांनी प्रवेशाचे नियम, कार्यपद्धती आणि माहिती पुस्तिका अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करावी. तसेच थेट प्राप्त अर्ज आणि कॅप पोर्टलवरून प्राप्त उमेदवारांच्या यादीच्या आधारे प्रवर्गनिहाय गुणवत्ता यादी तयार करून ती संकेतस्थळावर आणि सूचना फलकावर प्रसिद्ध करावी लागेल. - रोजचा अहवाल अनिवार्य प्रत्यक्ष उपस्थित विद्यार्थी, पालक व नातेवाईक तसेच प्रवेश निश्चित झालेल्या विद्यार्थ्यांची दररोज नोंद ठेवून अहवाल सीईटी कक्षाला पाठवावा लागेल. प्रवेश निश्चित झाल्यानंतर तो तातडीने अधिकृत कॅप पोर्टलवर नोंदविणेही बंधनकारक आहे. - निरीक्षक ठेवणार लक्ष निवडक खासगी महाविद्यालयांमध्ये नजीकच्या शासकीय महाविद्यालयातील प्राचार्य, संचालक किंवा वरिष्ठ प्राध्यापकांची निरीक्षक म्हणून नियुक्ती केली जाणार आहे. कागदपत्र पडताळणी, गुणवत्ता यादी, शुल्क भरणा आणि जागावाटपावर ते देखरेख ठेवतील. - एजंटांपासून सावध राहा कॅप फेऱ्या पूर्ण होण्यापूर्वी प्रवेश मिळवून देण्याचे आश्वासन देणारे एजंट, मध्यस्थ किंवा खासगी समुपदेशकांच्या प्रलोभनांना बळी पडू नये. सोशल मीडिया व खासगी लिंकवरील दिशाभूल करणाऱ्या माहितीपासूनही सावध राहावे, असे आवाहन सीईटी कक्षाने केले आहे. प्रवेशासंबंधी येणाऱ्या अडचणींसाठी जिल्हानिहाय विद्यार्थी सहायता केंद्राशी संपर्क साधण्याचे आवाहन सीईटी सेलतर्फे करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com