
Maharashtra Education
sakal
छत्रपती संभाजीनगर : राज्यातील दहावी व बारावीच्या परीक्षा केंद्रांवर दरवर्षी उघडकीस येणाऱ्या गैरप्रकारांना रोखण्यासाठी राज्य मंडळाने यंदा कडक भूमिका घेतली आहे. फेब्रुवारी-मार्च २०२५ च्या परीक्षेत ज्या केंद्रांवर गैरप्रकार सिद्ध होतील, ती सर्व केंद्रे कायमस्वरूपी बंद करण्यात येणार आहेत. विभागीय मंडळांना यासंदर्भात तातडीने कारवाई करून अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले असून, संपूर्ण परीक्षा केंद्र व्यवस्थेची मोठी पुनर्रचना होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.