B.Pharmacy: ‘बी.फार्मसी’च्या पहिल्या फेरीत जागा वाटप; राज्यभरातील २९ हजार १६६ विद्यार्थ्यांचा समावेश
B Pharmacy Admission: राज्यातील बी.फार्मसी प्रवेश प्रक्रियेतील पहिल्या फेरीसाठी २९,१६६ विद्यार्थ्यांना जागा मिळाली. ३,८९५ विद्यार्थ्यांना पहिल्या पसंतीचे कॉलेज मिळाले, तर १४,१२१ विद्यार्थ्यांना अजून जागा मिळालेली नाही.
छत्रपती संभाजीनगर : राज्यातील बी.फार्मसी प्रवेश प्रक्रियेतील केंद्रीकृत प्रवेश प्रक्रियेच्या पहिल्या फेरीसाठी निवड यादी जाहीर झाली आहे. या फेरीतून २९ हजार १६६ उमेदवारांना पहिल्या फेरीत जागा वाटप जाहीर झाले.