

devendra fadnavis, eknath shinde, ajit pawar
esakal
मराठवाड्याच्या विकासाकडे सरकारचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष असल्याचा आरोप शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते अंबादास दानवे यांनी पत्रकार परिषदेत केला. हैद्राबाद मुक्ती संग्रामाच्या स्मृतीदिनी बोलताना त्यांनी शिंदे सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. राज्यावर 9 लाख कोटींचे कर्ज असताना आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांचे अतिवृष्टीमुळे प्रचंड नुकसान होत असताना, सरकार मात्र ‘देवभाऊंच्या’ 200 कोटींच्या जाहिरातींवर खर्च करत असल्याचा आरोप त्यांनी केला.