
छत्रपती संभाजीनगर : महापालिका निवडणुकीचा बिगुल वाजला असून, चार वॉर्डांची एक प्रभाग यानुसार रचना करण्याचे आदेश राज्य शासनाच्या नगर विकास विभागाने महापालिकेला दिले आहेत. २०२२ च्या लोकसंख्येच्या आधाराचा आदेशात उल्लेख करण्यात आला असून, त्यानुसार नगरसेवकांची संख्या १२६ पर्यंत जाण्याची शक्यता आहे. तसेच प्रभागांची संख्या २९ होईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. दरम्यान, वॉर्डांसाठी कोणत्या लोकसंख्येचा आधार घ्यायचा, यासंदर्भात सविस्तर आदेश प्राप्त होतील, असे सूत्रांनी सांगितले.