University Professors: राज्यातील सार्वजनिक अकृषी विद्यापीठांमध्ये प्राध्यापकांची भरती अधिक पारदर्शक व निष्पक्ष व्हावी, असे निर्देश राज्यपाल कार्यालयाकडून आले आहेत. यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील ७३ प्राध्यापकांच्या पदांच्या भरतीला गती मिळणार आहे.
छत्रपती संभाजीनगर : राज्यातील सार्वजनिक अकृषी विद्यापीठामधील अध्यापकांची निवड प्रक्रिया अधिक पारदर्शक, निपक्ष आणि संतुलित व्हावी, यासाठी राज्यपाल कार्यालयाकडून प्राप्त झालेल्या निर्देशांनुसार कार्यपद्धती निश्चित केली आहे.