Ladki Bahin Yojana latest update
esakal
परभणी : विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्य सरकारने सुरू केलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरुवातीपासूनच विविध कारणांमुळे चर्चेत राहिली (Maharashtra Ladki Bahin Yojana latest update) आहे. या योजनेंतर्गत पात्र महिलांच्या बँक खात्यात दर महिन्याला दीड हजार रुपये जमा केले जातात. मात्र, योजनेच्या निकषांचे उल्लंघन करून लाभ घेतल्याचे प्रकार समोर आल्यानंतर सरकारने लाभार्थी महिलांची पडताळणी करण्यासाठी ई-केवायसी प्रक्रिया बंधनकारक केली.