Maharashtra Education : जिल्हा परिषद शाळांच्या बदनामीचा ‘असर’; महाराष्ट्र राज्य शिक्षक समितीकडून अहवालाचा निषेध
Maharashtra Teachers : महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीने २०२४ च्या एका अहवालाचा तीव्र निषेध केला आहे, ज्यात सरकारी शाळांची शैक्षणिक गुणवत्ता कमी असल्याचा दावा करण्यात आला आहे. शिक्षक समितीचा आरोप आहे की हा अहवाल सरकारी शाळा बंद करण्याच्या षड्यंत्राचा एक भाग आहे.
छत्रपती संभाजीनगर : राज्यातील सरकारी शाळांबाबत सातत्याने नकारात्मक प्रतिमा निर्माण करणाऱ्या एका प्रसिद्ध गैरसरकारी संस्थेच्या २०२४ च्या अहवालाचा महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीने तीव्र निषेध केला.