महाराष्ट्र पब्लिक स्कूल करणार नववी, दहावीचे वर्ग बंद; पालक आक्रमक, मनसेचाही पाठिंबा

विद्यार्थ्यांना जबरदस्तीने टीसी दिल्या तर शाळेविरोधात लढा उभा करु, असा इशारा देण्यात आला.
औरंगाबाद : महाराष्ट्र पब्लिक स्कूलच्या नववी, दहावीचा वर्ग बंद करण्याच्या निर्णयाविरोधात शाळेसमोर जमलेले पालक, मनसेचे पदाधिकारी.
औरंगाबाद : महाराष्ट्र पब्लिक स्कूलच्या नववी, दहावीचा वर्ग बंद करण्याच्या निर्णयाविरोधात शाळेसमोर जमलेले पालक, मनसेचे पदाधिकारी.सकाळ
Updated on: 

औरंगाबाद : दौलताबाद (Aurangabad) येथील महाराष्ट्र पब्लिक स्कूलने (Maharshtra Public School) मराठी माध्यम विभागाचे नववी, दहावीचे वर्ग बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. शाळा प्रशासनाच्या विरोधात मंगळवारी (ता.१८) पालकांसोबत मनसेच्या (Maharshtra Navnirman Sena) शिष्टमंडळाने शाळेत धडक मारत या निर्णयाचा विरोध केला. विद्यार्थ्यांना जबरदस्तीने टीसी दिल्या तर शाळेविरोधात लढा उभा करु, असा इशारा देण्यात आला. यावेळी पालकांतर्फे शाळा प्रशासनाला निवेदन देण्यात आले. महाराष्ट्र पब्लिक स्कूलचे प्रशासन सोमवारी शाळा बंद करणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर पालकांनी मनसेच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क केला होता. (Maharashtra Public School To Be Close Ninth, Tenth Divisions)

औरंगाबाद : महाराष्ट्र पब्लिक स्कूलच्या नववी, दहावीचा वर्ग बंद करण्याच्या निर्णयाविरोधात शाळेसमोर जमलेले पालक, मनसेचे पदाधिकारी.
औरंगाबादेत पेट्रोल शंभरी पार, डिझेल ९२ रुपये

त्यानंतर जिल्हाध्यक्ष सुहास दाशरथे यांच्या मार्गदर्शनाखाली मंगळवारी (ता.१८) मनसेच्या शिष्टमंडळाने शाळेत धडक मारली. शाळा अशा प्रकारे कोणतेही वर्ग बंद करण्याचा निर्णय शाळा घेवू शकत नाही. जर शाळा जबरदस्तीने विद्यार्थ्याला टीसी देत असेल; तर मनसे पालकांसोबत शाळेविरोधात लढा देण्यास खंबीर आहे, असे यावेळी शाळेच्या व्यवस्थापनाला सांगण्यात आले. दरम्यान पालकांच्यावतीने शाळेला निवेदनही देण्यात आले. यावेळी मनसे शिक्षक सेनेचे राज्य सचिव सुभाष मेहेर, बिजू मारक, जिल्हा संघटक संदीप कुलकर्णी, अशोक म्हस्के पाटील, मच्छिंद्र मोरे, सागर कुंटे, अनिकेत ठोकळ, नागेश देशमुख, राजेश इंगळे व विद्यार्थी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com