औरंगाबादेत पेट्रोल शंभरी पार, डिझेल ९२ रुपये

काही वर्षांपूर्वी भारत सरकारने पेट्रोल कंपन्यांवर इंधन दर ठरवण्याचा अधिकार दिला होता. त्यामुळे पेट्रोल कंपन्या दररोज दरवाढ करताना दिसत आहेत.
औरंगाबादेत पेट्रोलपंपावर छापे; वैधमापनशास्त्र पथकाकडून मोजमाप
औरंगाबादेत पेट्रोलपंपावर छापे; वैधमापनशास्त्र पथकाकडून मोजमाप

औरंगाबाद : दोन मे रोजी पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू, केरळ आणि पुद्दुचेरी या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचा निकाल जाहीर झाल्यानंतर दररोज पेट्रोल व डिझेलचे भाव वाढत आहेत. औरंगाबादेत ( Petrol And Diesel Price In Aurangabad) आज मंगळवारी (ता.१८) पेट्रोलने (Petrol Price) शंभरी पार केली आहे. आताचा दर १०० रुपये ४३ पैसे प्रतिलिटर इतका झाला आहे. तसेच डिझेल ग्राहकांना ९२ रुपयांना मिळत आहे, याबाबत औरंगाबाद जिल्हा पेट्रोल, डिझेल डिलर्स असोसिएशनचे सचिव अखिल अब्बास (Aqeel Abbas) यांनी माहिती दिली आहे. (Petrol Price Crossed 100 In Aurangabad, Diesel By 92 Rupees)

औरंगाबादेत पेट्रोलपंपावर छापे; वैधमापनशास्त्र पथकाकडून मोजमाप
विद्यार्थी असताना आली अडचण अन् थेट कंपनीच केली सुरू, योगेशचा प्रेरणादायी प्रवास

या दरवाढीचा फटका सर्वसामान्यांच्या खिशाला बसणार आहे. कारण किराणामाल, पालेभाज्या, प्रवासभाडे आदींना जास्त पैसे मोजावे लागणार आहेत. काही वर्षांपूर्वी भारत सरकारने पेट्रोल कंपन्यांवर इंधन दर ठरवण्याचा अधिकार दिला होता. त्यामुळे पेट्रोल कंपन्या दररोज दरवाढ करताना दिसत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com