

Education officials will verify student attendance and enrollment records at schools across Maharashtra in December.
esakal
छत्रपती संभाजीनगर, : शाळांची पटसंख्या आणि प्रत्यक्ष वर्गात उपस्थित असलेल्या विद्यार्थ्यांची संख्या यातील तफावत शोधण्यासाठी शिक्षण विभागाने पुन्हा एकदा पटपडताळणीचा धडाका सुरू केला आहे. विशेष म्हणजे, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेमार्फत यावेळी मोहिमेदरम्यान नियतकालिक मूल्यांकन चाचणी (पॅट) देखील आयोजित केली आहे. त्यामुळे पॅट परीक्षेसोबतच पटपडताळणी करण्याचे नियोजन शिक्षण विभागाने केले आहे.